ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 21 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 21 April 2025
मुंबई २६/११ हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात, भाजप नेते माधव भांडारींचा खळबळजनक दावा...प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीशिवाय हल्ला अशक्य असल्याचंही विधान
चौैकशी करून कोण कोण जबाबदार आहेत शोधून कारवाई करू, आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया तर आमदारकी न मिळाल्यानं भंडारी वैफल्यग्रस्त, अनिल देशमुखांचा खोचक टोला...
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना, २९ एप्रिलनंतर राज ठाकरे युतीबाबत निर्णय कळवतील, प्रवक्ते प्रकाश महाजनांची एबीपी माझाला माहिती
महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, भूतकाळ विसरुन पुढे जायचं ठरवल्याचा दावा
पुण्यातील साखर संकुलातील बैठकीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामासंबंधी वेगळी बैठक, शरद पवार आणि अजित पवारांसह व्हीएसआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीवर अजित पवाराचं भाष्य, शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजितदादांची स्पष्टोक्ती
संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा, भाजप पदाधिकाऱ्याचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त



















