एक्स्प्लोर

Video: त्याला सोडलं जाणार नाही, मी स्वतः पोलीस आयुक्ताशी बोललोय; मीनाताईंच्या पुतळाप्रकरणी एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते आज खोणी गावात पार पडला.

ठाणे : मुंबईच्या (Mumbai) दादर येथील शिवाजी पार्कमध्ये असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न समाजकंटकाकडून करण्यात आलाय. काल (16 सप्टेंबर) रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जात असून आज सकाळी ही घटना उघडकीस आल्याने शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा लाल रंग नेमका कोणी टाकला, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवाजी पार्कमध्ये जाऊन मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केली. तसेच, ही घटना अतिशय निंदनीय असून पोलिसांनी तो अज्ञात व्यक्ती शोधावा, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते आज खोणी गावात पार पडला. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संबंधित घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना अतिशय निंदनीय आहे, कोणालाही सोडले जाणार नाही. यासंदर्भात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घातले आहे, ही बाब गांभीर्याने घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. कोणत्याही परिस्थिती त्या समाजकंटकाला सोडले जाणार नाही, असे शिंदेंनी स्पष्ट शब्दात सांगितले.

कडक कारवाईचे आदेश - योगेश कदम

मुंबईमधील घटनेचा कोणीही समर्थन करत नाही, माँ साहेबांबाबत प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आदर आहे, ही अतिशय निंदनीय घटना आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. कारण आणि उद्देश काय आहे, यावर कारवाई करण्यात येईल. आज सकाळी सव्वा 6 ते 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे, कुठल्या उद्देशाने हे कृत्य केलं आहे, तो ताब्यात आल्यानंतरच कळेल, असेही गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलं.

शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रकार नसेल ना - भास्कर जाधव

स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील पुतळ्याची विटंबना करण्याचा नालायक प्रयत्न केला गेला, ज्यांना उभा महाराष्ट्र माँ म्हणून ओळखतो. मीनाताई ठाकरे यांनी आपल्या संस्काराने मायेने आणि संस्कृतीने तसेच एका नेत्याच्या पत्नी असून देखील सोज्वळ मायेने सगळ्यांना जोपासले होते. उत्तम गृहिणी, आदर्श पत्नी, माता कशी असावी याचे सुद्धा आपल्या वागण्याने-बोलण्याने आणि त्याचबरोबर संयमी कृतीने दाखवून दिले. आपली ओळख माँ म्हणून निर्माण केली. ज्या कोणी नालायक व्यक्तीने हा प्रयत्न केला, त्यांना एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही माँसाहेब यांच्या पुतळ्याचा कुठेतरी अवमान करण्याचा प्रयत्न कराल. पण, माँसाहेबांच्या जीवनावर, माऊली म्हणून त्यांची संस्कृती, सभ्यता यावर डाग लावता येणार नाही. मला माहित आहे, एका पक्षाचे नेते म्हणाले होते की, आम्ही शिवसेनाभवन सुद्धा तोडू. काही नेते जहाल भाषणे पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करत आहेत, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले. त्यातलाच हा प्रकार शिवसैनिकाना चिडवण्याचा नसेल ना याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आजच प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे. एक थोर समाजसुधारक, जे संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह झाला पाहिजे अशा लढ्यात होते, त्यांची जयंती आहे. अशावेळी हा घृणास्पद प्रकार घडला, याचा मी निषेध करतो, असेही जाधव यांनी म्हटले. पोलीस खाते कुठे गेले, कुठे गेले सुरक्षा यंत्रणा? लवकरात लवकर तपास करा. जाणीवपूर्वक कोणी करत नसेल ना, जर करत नसेल तर तात्काळ सर्व समोर आले पाहिजे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली.

हेही वाचा

मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; उद्धव ठाकरे म्हणाले, हे दोघेच करु शकतात, ते म्हणजे...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी नवी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी नवी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget