ABP Majha Headlines : 7 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
गेल्या काही दिवसात उत्तरेकडील शीत लहरींचा वाढलेल्या प्रभावामुळे राज्यात चांगलाच गारठा वाढलाय. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान शुन्याखाली गेलंय. राज्यात पुढील तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात तापमानात काहीशी चढउतार संभवते.दरम्यान, विदर्भात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून उत्तर महाराष्ट्रही गारठलाय. जळगावात बुधवारी 8.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर बहुतांश ठिकाणी 10 अंशांखाली तापमान गेले होते.
भारतीय हवामान केंद्राचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी तापमानाचा पारा घसरल्याचे सांगत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बुधवारी किमान तापमानाच्या नोंदी सांगितल्या आहेत. राज्यात काल 8.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नांदेडमध्ये 8.9 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली.नाशिक, बारामती, उद्गीर, नागपूर जिल्ह्यात 9 अंशांवर तापमान गेलं होतं. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली असून धाराशिव 8.6, नांदेड 8.9 अंश सेल्सियसवर होते.कुठे कसं होतं तापमान पाहूया..