ABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP Majha
ABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP Majha
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून न्यायालयाची पालिका, राज्य सरकारसह अन्य प्राधिकरणांच्या कारभारावर नाराजी, आता विकास किंवा स्वच्छ हवा यापैकी एक निवडण्याची वेळ आली आहे, उच्च न्यायालयाकडून खंत व्यक्त.
आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे २२ टक्के नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता, २०३० पर्यंत एआयचा रोजगार बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची चिन्हं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालात माहिती.
टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताकडून हायकोर्टात पोलीस संरक्षणाची मागणी..आर्थिक घोटाळ्याची माहिती सर्वप्रथम अभिषेकनेच दिली मुंबई पोलिसांना
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, उद्धव ठाकरेंकडून स्मारकाची पाहणी..
ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट्स अगेन्स्ट मोहल्ला, आमदार नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर भाजप आमदार सुरेश खाडेंकडून मिरज विधानसभा मतदारसंघाचा मिनी पाकिस्तान उल्लेख
राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, शरद पवारांनी संघाचं कौतुक केल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं सूचक विधान...