ABP Majha Headlines : 5 PM : 8 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 5 PM : 8 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई
२०१९मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने नीती फिरल्याची ठाकरेंवर टीका
तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शाहांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन दगा दिला, उद्धव ठाकरेंचा पुनरूच्चार, भाजपने पाठीत वार केल्याचा आरोप
कटकारस्थान करणाऱ्या भाजपसोबत यापुढे जाणार नाही, संजय राऊतांचा निर्धार, लवाद म्हणून बसलेले गृहस्थ चोरमंडळाचे अध्यक्ष, राहुल नार्वेकरांवर टीका
बँडबाजा वाजलेल्या पक्षाने गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल, तर संजय राऊतांसारख्या घरगड्याने चिंता करू नये, भाजपचं ट्विट
महायुतीच्या जागावाटपाबाबत दिल्लीत बैठक, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शाहांशी चर्चा करणार, अंतिम निर्णयाची शक्यता