(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 12 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
उत्तर भारताकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या सुटणाऱ्या मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर (Bandra Terminus Stampede) रविवारी पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळपासून या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेसाठी रेल्वे पोलिसांचे (Railway Police) नियोजन कारणीभूत असल्याची चर्चा आहे. रेल्वे पोलिसांना गर्दीचे नियोजन नीट न करता आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते. रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनसवर पहाटे पावणेतीन वाजता ही घटना घडली. वांद्रे ते गोरखपुरसाठीची 22921 अंत्योदय एक्सप्रेस फलाट क्रमांक 1 वर आल्यानंतर हा प्रकार घडला. ही गाडी स्थानकात येत असतानाच काही प्रवाशांनी जागा पकडण्यासाठी सामान घेऊन गाडीत चढायला सुरुवात केली. या एक्स्प्रेस ट्रेनचे 22 डबे अनारक्षित होते. त्यामुळे या गाडीत चढण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली. याचे पर्यवसन चेंगराचेंगरीत होऊन अनेक प्रवासी जखमी झाले. ही घटना पहाटे घडल्यामुळे बराचवेळ याबद्दलची माहिती समोर आली नाही. मात्र, सकाळी ही बातमी पसरल्यानंतर अनेकांनी वांद्रे टर्मिनसच्या दिशेने धाव घेतली. यावेळी एक नंबर प्लॅटफॉर्मवरील रेल्वे ट्रॅकवर चपलांचा खच पडल्याचा दिसत होते. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच रेल्वेकडून तातडीने या चपला हटवण्यात आल्या.