ABP Majha Headlines : 9:00 AM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9:00 AM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात...१७ हजार जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित...
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईनच होणार, दुर्गम भागात काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मिळणार न्याय
आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार.
मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान
कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया...
२०० हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा, उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार, प्रकाश आंबेडकरही भेट घेण्याची शक्यता