एक्स्प्लोर

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव

Beed News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Beed News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. ही यात्रा मंगळवारी माजलगावात आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर शहरातील मुख्य रस्त्यावर व राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना लावण्यात आले होते. यातीलच धरणाच्या कमानीजवळ लावलेले एक बॅनर काढताना वीज वाहक तारेला बॅनरचा स्पर्श होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गौतम सरपते राहणार  केसापुरी असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रात्री  घडली.

परवानगी न घेतला लावले होते बॅनर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा माजलगावात आली होती. त्या निमित्ताने मंगलनाथ मैदान या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वागताचे बॅनर सिंदफणा नदी पात्र ते केसापुरी कॅम्पपर्यंत लावले होते. 5 किमीपर्यंत लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहरातून चालणे मुश्किल झाले होते. या लावण्यात आलेल्या बॅनरला माजलगाव नगरपालिका व राष्ट्रीय महामार्गाकडून कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नव्हती. दरम्यान, बाजार समितीचे सभापती यांनी धरणाच्या कमानीजवळ त्यांचे स्वतःचे बॅनर लावले होते. हे बॅनर देखील विनापरवानगी लावण्यात आले होते. काल रात्री 11 वाजता हे बॅनर काढत असताना बॅनरचा स्पर्श वीज वाहक तारेस झाल्याने विजेचा धक्का बसून गौतम हरपते या 25 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या:

Gulabrao Patil : 'अजितदादांची जनसन्मान यात्रा गुलाबी म्हटली जाते, योगायोगाने माझही...'; गुलाबराव पाटलांची मिश्कील प्रतिक्रिया

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
Marathwada Farmers: दुष्काळाचं भयाण संकट गडद अन् पाच हजारांची अग्रिम मदत मात्र कागदावरच; दिवाळी उलटूनही मराठवाड्यातील तब्बल 21 लाख 34 हजार शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम!
दुष्काळाचं भयाण संकट गडद अन् पाच हजारांची अग्रिम मदत मात्र कागदावरच; दिवाळी उलटूनही मराठवाड्यातील तब्बल 21 लाख 34 हजार शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम!
Beed Suresh Dhas: विरोधात काम करणाऱ्याची बाजू घेतो का? सुरेश धसांच्या दमदाटीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, नेमकं काय प्रकरण?
विरोधात काम करणाऱ्याची बाजू घेतो का? सुरेश धसांच्या दमदाटीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, नेमकं काय प्रकरण?
राष्ट्रवादीत अर्थखातं मिळवण्याची धमक नाही, फडणवीस ब्लॅकमेल करुन अर्थखातं त्यांच्याकडे ठेवतायेत, सपकाळांचा हल्लाबोल 
राष्ट्रवादीत अर्थखातं मिळवण्याची धमक नाही, फडणवीस ब्लॅकमेल करुन अर्थखातं त्यांच्याकडे ठेवतायेत, सपकाळांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
Embed widget