एक्स्प्लोर

Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांचा धाक संपला? नागरिकांचा संताप

Nashik Crime News : श्रमिकनगरमध्ये आठ जणांच्या कोयता गँगने एका तरुणाला कोयता व हॉकी स्टिकच्या साहाय्याने जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

नाशिक : शहरात (Nashik Crime News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. सातपूरच्या (Satpur) श्रमिकनगरमध्ये (Shramiknagar) आठ जणांच्या कोयता गँगने एका तरुणाला कोयता व हॉकी स्टिकच्या साहाय्याने जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ऐन घटस्थापनेच्या दिवशी सर्वांकडे उत्साहाचे वातावरण असताना सदर कोयता गँगने दहशत पसरवून नागरिकांना भयभीत करून सातपूर पोलिसांना (Satpur Police) आव्हान दिले आहे. सदर थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास श्रमिकनगर येथील राधाकृष्णनगर मधील धात्रक चौकामध्ये अ‍ॅक्टिवावरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या रिक्षमधील आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. पूर्व वैमानस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  

हॉकी स्टिक, स्टम्प व कोयत्याने वार

अ‍ॅक्टिवावरील दोन जणे जीव वाचवण्यासाठी पळून गेले. परंतु अतुल खरे (रा. हिंदी शाळा, श्रमिकनगर) या तरुणास आठ जणांनी सिनेस्टाईलमध्ये हॉकी स्टिक, स्टम्प व कोयत्याने डोके, पाठ व पायावर जबरी वार केले. वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्यामुळे कोणीही यात पडण्याची हिंमत केली नाही. 

जखमीची प्रकृती चिंताजनक

अतुलच्या सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खाजगी दवाखान्यात नेले. परंतु, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

कठोर कारवाईची मागणी

दरम्यान, अशोकनगर, राधाकृष्णनगर, गंगासागर नगर परिसरात अशा घटना नेहमी होत असल्याने नागरिकांनी सातपूर प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. या दहशत माजवणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. तर काही दिवसांपूर्वी सातपूर  पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी ज्या ठिकाणी गुन्हेगारी घडली त्या ठिकाणी गुन्हेगारांची थेठ धिंड काढली होती. मात्र, गुन्हेगार पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या आहेत. 

आणखी वाचा 

Chaitanya Maharaj Arrested: ...तेव्हा पोलिसांची सहनशीलता संपली, चैतन्य महाराजांना दाखवला इंगा; अटकेचं नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

खिडकीतून लपून मुलींना आंघोळ करताना बघायचा; घराबाहेर कॅमेरा लावला अन् तावडीत सापडला, भाईंदरमधील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 :  टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 13 December 2024 : 7.30 PM ABP MajhaAjinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखाABP Majha Headlines : 07 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Embed widget