(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!
केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत आता रेल्वे कर्मचाऱ्यांना एकूण 78 दिवसांच्या पगाराएवढे बोनस मिळणार आहे.
नवी दिल्ली : आता सणासुदीचे दिवस आले आहेत. गणेशोत्सव नुकताच पार पडला. आता दुर्गोत्सव आहे. त्यानंर दसरा दिवाळी हे सण येणार आहेत. या सणाच्या निमित्ताने सरकारी विभाग तसेच खासगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करतात. काही कंपन्या तर आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या भेटवस्तूदेखील देतात. दरम्यान, रेल्वे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी होणार आहे. कारण केंद्र सरकारने या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठं बोनस जाहीर केलं आहे.
11.72 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार
यावेळी केंद्र सरकारने रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाईतके बोनस जाहीर केले आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगारापेक्षा अधिक रक्कम थेट बोनस म्हणून मिळणार आहे. केंद्र सरकारची नुकतीच एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार या निर्णयाचा फायदा एकूण 11.72 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने या बोनसला प्रोडक्टिव्हीटी लिंक्ड रिवॉर्ड असं म्हटलंय.
पैसे नेमके कोणाला मिळणार?
रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना हे बोनस मिळावे यासाठी सरकारने एकूण 2029 कोटी रुपये मंजूर केले आहेत. रेल्वे खात्यात वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारच्या घोषणेअंतर्गत बोनस मिळणार आहे. ट्रॅक मेन्टेनर्स, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड्स), स्टेशन मास्तर, सुपरवायजर्स, टेक्निशियन हेल्पर, पॉइंट्समन, मिनिस्टेरियल स्टाफ, अन्य XC स्टाफ आदी कर्मचाऱ्यांना हे बोनस मिळणार आहे. रेल्वे विभागाचे काम आणखी सुधारावे, सेवेत आणखी सुधारणा व्हावी तसेच रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हे बोनस दरवर्षी जाहीर केले जाते.
एकूण 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार
दरवर्षी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना हे बोनस मिळते. दुर्गा पुजा, दसरा या सणांच्या मुहूर्तावर या बोनसचे वितरण केले जाते. यावेळी कर्मचाऱ्यांची एकूण 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. सरकारच्या या घोषणेअंतर्गत रुपये जास्तीत जास्त 17,951 बोनस दिले जाणार आहे.
हेही वाचा :
राज्य सरकारचं गिफ्ट; BMC,बेस्टचे कर्मचारी, शिक्षक यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर
लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा