महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
सरकारनं लाडकी लेक योजना (Ladki Lek Yojana) आणली आहे, त्याचे स्वागत आहे. पण तेवढ्यावर भागत नाही. मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारनं पाऊल उचलले पाहीजे असं वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं.
Sharad Pawar : सरकारनं लाडकी लेक योजना (Ladki Lek Yojana) आणली आहे, त्याचे स्वागत आहे. पण तेवढ्यावर भागत नाही. मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारनं पाऊल उचलले पाहीजे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक असल्याचे पवार म्हणाले. लाडकी लेकसाठी हजारो कोटींची तरतूद करत असताना सरकारच्या अन्य योजना थंडावल्या आहेत असं शरद पवार म्हणाले. ते सांगलीत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले.
मराठी शाळांची संख्या कमी होणं चिंताजनक
मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर मराठी शाळांमधील मुलांची संख्या देखील कमी होत आहे. वारंवार या दोन तक्रारी येत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. यामुळं शिक्षकांच्या नोकऱ्या देखील कमी होत आहेत. यासाठी सर्वांनी बसावं लागेल, राज्य सरकारला लक्ष द्यावं लागेल असे शरद पवार म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले शरद पवार?
मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे ही लोकांची भावना असल्याचे शरद पवार म्हणाले. इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टिका केली. त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलतात, हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला. आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असे मत शरद पवार यांनी केलं. यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ असेही शरद पवार म्हणाले. तुम्हाला एवढी एनर्जी येते कुठून? असा प्रश्न देखील प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारला. यावेळी शरद पवार म्हणाले की, जसे जसे वय वाढते तस तशी एनर्जी वाढते. यावेळी बोलतना शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्याबबातही प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी यांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांना जे योग्य वाटते ते भले सरकारच्या विरोधात असतील तरी बोलतात असंही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: