ABP Majha Headlines : 12 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये बड्या आणि अनेक दिवस चर्चेत राहिलेल्या अधिकाऱ्याची एंन्ट्री झाली आहे, आयआरएस अधिकारी समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात उतरणार आहेत. ते महायुतीकडूनही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईतील विधानसभेच्या जागेवरून समीर वानखेडे निवडणूक लढवणार आहेत.
महाराष्ट्रातील आयआरएस अधिकारी समीर वानखेडे राजकारणात उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहे. समीर वानखेडे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.