(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 12 PM : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आचारसंहितेआधी मराठ्यांच्या सर्व मागण्या फडणवीस मान्य करतील अशी आशा, जरांगेंचं वक्तव्य, मागण्या मान्य केल्या नाहीतर फडणवीसांच्या कारकिर्दीतली मोठी चूक, जरांगेंचा इशारा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा १३ ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता, काही नियमांमुळे निवडणूक जाहीर करण्यास उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती
विधानसभेच्या सर्व २८८ जागांचा निर्णय एकाच दिवशी जाहीर करु, अजित पवारांचं स्पष्टीकरण... महायुतीत कसलेही मतभेद नसल्याचा दावा
महाविकास आघाडीचं सारं चित्र दसऱ्यापूर्वी स्पष्ट होईल, संजय राऊतांची माहिती, पंतप्रधान मोदी गल्लीबोळात का फिरतायत असा सवाल..
जग्गी वासुदेव यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, ईशा फाऊंडेशनविरुद्धच्या हायकोर्ट आदेशांना स्थगिती, पोलीस आश्रमात जाऊ शकत नाही असं निरीक्षण..
शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण, सोहळ्याआधी रोह्यात भव्य मिरवणूक
घृणास्पद गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराचं शिक्षापात्र वय १६ वरुन १४ आणता येईल का याचा विचार, अमित शाहांशी अजित पवारांची चर्चा