ABP Majha Headlines : 10 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं, दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू, जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार...
मुख्यमंत्री शिंदेंकडून घाटकोपरमधील दुर्घटनेस्थळी पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर, घटनेला जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार
पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत, गाड्या अजूनही २० ते २५ मिनिटं उशिराने, विविध स्थानकांवर तोबा गर्दी
पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत, गाड्या अजूनही २० ते २५ मिनिटं उशिराने, विविध स्थानकांवर तोबा गर्दी
मुंबईसह कल्याण डोंबिवली, बदलापूरलाही पावसाने झोडपलं, वांगणी स्थानकाचे पत्रे उडून गेले, पालघरमध्ये काही भागात गारांचा पाऊस, रायगडमध्ये अवकाळीमुळे आंबा बागायतदार संकटात
ढगाळ हवामानामुळे अमित शाहांनी हेलिकॉप्टर प्रवास टाळला, अमित शाह वसईतून रस्ते मार्गाने मुंबईकडे, तर डोंबिवलीतील उद्धव ठाकरेंची सभा रद्द
आत्तापर्यंत राज्यात ५२.६३ टक्के मतदान, नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६० मतदान, तर शिरूर आणि पुण्यात सर्वात कमी ४४ टक्के मतदान
शिंदेंच्या दोन तासांच्या दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅगा का, संजय राऊतांचं हेलिकॉप्टरच्या व्हिडीओवर बोट, नाशिक, नगरमध्येही पैसे वाटल्याचा आरोप, महायुतीकडून आरोपांचं खंडन
नगरमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भाजप उमेदवारांकडून स्वत:चा प्रचार, निलेश लंकेंचा आरोप...तर शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभार, अमोल कोल्हेंचा आरोप
बारामतीच्या स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही ४५ मिनिटं बंद पडल्याचा शरद पवार गटाचा आरोप... मात्र सीसीटीव्हीमध्ये नव्हे तर स्क्रीनमध्ये बिघाड, निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा...
शिरुरमधील राजगुरुनगरमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप...तर पुण्यात शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदेंच्या नावे दुसऱ्यानेच बोटाला शाई लावल्याचा दावा