ABP Majha Headlines : 09 PM : 15 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 09 PM : 15 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल.
अजित पवारांचा गटच खरी राष्ट्रवादी, निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचाही निर्णय, शरद पवार गटाला मोठा धक्का.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार, शिवसेनेचाच निकाल काॅपी पेस्ट, सुप्रिया सुळेंची टीका, तर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची सुळेंची एबीपी माझावर प्रतिक्रिया.
राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल, मिलिंद देवरा, प्रफुल पटेल, मेधा कुलकर्णी, अजित गोपछ़डेंसह अशोक चव्हाणांनी भरला अर्ज.
खासदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी अर्ज का भरला हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल, प्रफुल पटेलांचं सूचक वक्तव्य, काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या, पटेलांचं विधान.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाचे अजय चौधरी, शरद पवार गटाचे राजेश टोपे उपस्थित.
मराठा आरक्षणासाठी २० आणि २१ फेब्रुवारीला अधिवेशन होण्याची शक्यता.. २१ फेब्रुवारीला आरक्षणाची अधिसूचना कायद्यात मंजूर होणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती.
हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगेंकडून उपचार घेण्यास मान्यता, डॉक्टरांनी सलाईन लावलं, मात्र जरांगेंना प्रचंड अशक्तपणा.
वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान, वाशिम बाजार समितीत विकण्यासाठी आणलेली तूर भिजल्यानं शेतकरी चिंतेत.
राजकीय पक्षांना निधी देण्यासाठीचे इलेक्टोरल बॉण्ड सुप्रीम कोर्टानं घटनाविरोधी ठरवले, २०१८ पासूनची सर्व माहिती स्टेट बँकेनं निवडणूक आयोगाला द्यावी, सुप्रीम कोर्टाचे आदेश.
अमिताभ आणि जया बच्चन यांच्याकडे दीड हजार कोटींपेक्षा अधिक मालमत्ता, १०० कोटींची ज्वेलरी, १७ कोटींच्या गाड्या आणि १३० कोटींचा बँक बॅलन्स.