ABP Majha Headlines : 08 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा श्लोक नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तर विरोधकांनी फेक नरेटीव्ह पसरवू नये, अजितदादांचा इशारा
सर्वाधिक पेपरफुटी, ड्रग्जप्रकरणं मविआच्या काळात, आणि हे आम्हाला प्रश्न विचारतात, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुंबईत ३०० एकरचं सेंट्रल पार्क उभारणार, रेसकोर्सवर एक इंचही बांधकाम करणार नाही, आदित्य ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार...वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अधिवेशन तापण्याची शक्यता.
उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला तर कोण कुणाला निरोप देतो कळेल, मुख्यमंत्र्यांचा पलटवार...
एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती