ABP Majha Headlines : 07 PM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो, भुजबळांचं वक्तव्य, तर पक्षात कोणी नाराज नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण
संघाच्या दाव्यावर अजितदादांचं तोंडावर बोट..ऑर्गनायझरमधील लेखातल्या टीकेला उत्तर देणं टाळलं तर राष्ट्रवादीच्या वाटेला केवळ २ जागा आलेल्या, भुजबळांचं प्रत्युत्तर
शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीटला अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला हजारेंचं आव्हान, याचिका दाखल करण्यास हजारेंना कोर्टाने दिला वेळ...
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील...सिल्लोडचा पाकिस्तान होतोय, या आरोपांना सत्तारांचं उत्तर...
विरोधकांनी सेट केलेले नरेटिव्ह खोडून काढा, १ टक्का मतं वाढवली तरी विधानसभेला क्लीन स्वीप करु, मंथन बैठक फडणवीसांच्या सूचना तर भाजपने केलेलं काम मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीही बैठक
फडणवीसांना व्हिलन म्हणणाऱ्या राऊतांवर भाजपचा पलटवार...राऊत राजकारणातले जोकर, नितेश राणेंचा प्रहार...तर फडणवीसांचं नेतृत्व सूर्यासारखं, बावनकुळेंचं उत्तर...
पुण्यात खासदार निलेश लंकेंनी घेतली गुंड गजा मारणेची भेट...गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, भेटीवर वादानंतर निलेश लंकेंचं स्पष्टीकरण
२७ जून ते १२ जुलै राज्याचं पावसाळी अधिवेशन..विधीमंडळ बैठकीत निर्णय तर विरोधकांकडून अधिवेशनाची मुदत वाढवण्याची मागणी
लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद स्वीकायला राहुल गांधी तयारी नसल्याची सूत्रांची माहिती...तब्बल १० वर्षांनंतर काँग्रेसला मिळाली विरोधी पक्षनेतेपदाची संधी...
भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही? विश्व हिंदू परिषद नेत्यांचा सवाल, वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरून तीव्र नाराजी...
फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली...पुण्यातील संसोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांच्या हाती लागला जुना खजिना...
आषाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची वारकऱ्यांना भेट, दीड हजार दिंड्यांना मिळणार प्रत्येकी २० हजार रुपयांचा निधी
उज्जैनमध्ये ९ सट्टेबाजांना अटक, १० कोटींची रोख रक्कम जप्त, वर्ल्डकपच्या सामन्यांवर लावत होते सट्टा
कॅलिफोर्नियात पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा, २ मिनिटांत २० दरोडेखोरांनी ज्वेलर्स लुटलं, पाच जणांना बेड्या