ABP Majha Headlines : 06.30 AM : 31 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईत मध्य रेल्वेवर रविवार दुपारपर्यंत विशेष मेगाब्लॉक, लोकलच्या एकूण ९३० फेऱ्या रद्द, नोकरदारांना सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होमची मागणी तर बेस्टच्या जादा बस फेऱ्या
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेतले, तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू, अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासणार
मनुस्मृती आंदोलनात बाबासाहेबांचा अपमान केल्याप्रकरणी आव्हाडांची माफी, आव्हाडांना भुजबळांचा पाठिंबा...तर, भुजबळांची भूमिका दुर्दैवी, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल...
भाजप आमदार आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कोकण पदवीधर निवडणुकीबद्दल चर्चा
डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोटातील ९ कामगार अजूनही बेपत्ता, २५ ते ३० मानवी अवशेष सापडले, अवशेषांची डीएनए टेस्ट करुन बेपत्ता कामगारांचा शोध घेणार
विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीत घराचा स्लॅब कोसळून दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू, दुर्घटनेला फेडरेशन आणि म्हाडा जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप.
घाटकोपर दुर्घटनेनंतर एमएमआरडीएच्या कारवाईविरोधात जाहिरात कंपनीची हायकोर्टात धाव, २४ तासांत कारवाईची नोटीस बेकायदा असल्याचा याचिकेत दावा, आज होणार तातडीची सुनावणी
बंगळुरुच्या गुलाबी कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क केंद्राने हटवले, महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यात शुल्क देखील हटवण्याची मागणी
राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली, ६ जुलैऐवजी २१ जुलैला परीक्षा घेण्यात येणार.. कुणबी नोंदींचा लाभ घेता यावा म्हणून परीक्षा पुढे ढकलली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिरात घेतलं दर्शन, विवेकानंद स्मारकावर १ जूनपर्यंत ध्यानधारणा करणार
अभिनेता सनी देओलला पोलिसांकडून चौकशीचे समन्स, २०१६ पासून चित्रपटात काम करण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याचा व्यावसायिकाचा आरोप