ABP Majha Diwali Ank - ABP माझाच्या पहिल्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा
आजचा दिवस आणि हा कार्यक्रम एबीपी माझासाठी अत्यंत विशेष आणि खास आहे. टेलिव्हिजन आणि डिजीटल विश्वात आजवर आम्ही तुम्हा प्रेक्षकांच्या साथीनं अनेक नवेप्रयोग केलेत. आपल्या आवडी निवडी जपत गेल्या 14 वर्षांच्या प्रवासात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेती, मनोरंजन, क्रीडा थोडक्यातआपल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवले. आज या प्रवासाचा पुढचा टप्पा आम्ही सुरु करतोय माझाच्या पहिल्या दिवाळी अंकासोबत. 100 वर्षांहून जुन्या दिवाळी अंकाच्या लेखन-वाचन संस्कृतीचे पाईक होत, एबीपी माझाचा हा दिवाळी अंक आम्ही तुम्ही प्रेक्षकांच्या वाचकांच्या हाती ठेवत आहोत. दिवाळी अंकांच्यासमृद्ध परंपरेच्या प्रवाहात ही छोटीशी ओंजळ वाहण्याच्या आमच्या प्रयत्नाचंमहाराष्ट्र नक्की स्वागत करेल याचा आम्हाला विश्वास आहे.