![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray Worli Vidhan Sabha : वरळीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, आदित्य ठाकरे अर्ज भरणार
Aaditya Thackeray Worli Vidhan Sabha : वरळीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, आदित्य ठाकरे अर्ज भरणार
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाकडे (Mahim Vidhan Sabha) सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाकरे घराण्यातील मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढणार आहे. अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी नसेल, कारण या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल.
अमित ठाकरेंना (Amit Thackeray) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल माहीममधील अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. आता माजी मंत्री आणि वरळीतील ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी देखील अमित ठाकरेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचे दोन भाऊ अमित ठाकरे आणि वरुण सरदेसाई देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. मी सर्वांना शुभेच्छा देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
![Bharat Gogawale Exclusive : मंत्रिपदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/c1c1f2d0b831e48dbd5515f6fa7f1c7c1732449724342976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/3b11e3f7e74ea7028caa1cf08bb378da1732448663373976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/bd5d840a1e15955ad6a4783629aef2021732448359640976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/2009e9b75ad919b4dc5d9522231fc8751732447959194976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्प](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/087d13987e41ae944ef55777e109088a1732444384596976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)