(Source: ECI/ABP News/ABP Majha)
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 02 August 2024 : ABP MAJHA
पूजा खेडकरने IAS होण्यासाठी सात वेगवेगळी नाव धारण केली,आई, वडिलांच्या नावात बदल करून सात वेळा भरले अर्ज, दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती.
पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, पूजा खेडकर नातेवाईकांच्या मदतीनं परराज्यात लपल्याची माहिती, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून शोध सुरु .
वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा झालाय दाखल.
पुण्यातील आणखी एका आयएएस अधिकाऱ्याचं पद धोक्यात, बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरुन आणि युपीएससीला खोटी माहिती देऊन पुण्याच्या अमोल आवटे यांनी पद मिळवल्याचा आयटीआर कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप.
येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार, संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदुना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार, लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलनं करणार.
आपापसातील वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता, नागपुरातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा.
गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, तर शिंदे गटाचे रविंद्र फाटक यांच्याकडूनही मतदारसंघात चाचपणी, ठाकरे गटाचे भास्कर जाधव या मतदारसंघाचे विद्यमान आमदार.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्यांमध्येच रस्सीखेच, तान्हाजी मुटकुळे आमदार असलेल्या हिंगोली मतदारसंघातून रामदास पाटील सुमठाणकर ही निवडणूक लढण्यास इच्छूक, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार.