(Source: ECI/ABP News/ABP Majha)
100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप, एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा 'शिवसेना शिंदे' असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही
लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख, संख्याबळाअभावी अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही...
((शरद पवारांच्या पक्षाचा NCP असाच उल्लेख!))
महायुतीमध्ये जवळपास ४० मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता...
संभावित ४० जागांची यादी एबीपी माझाच्या हाती...सामोपचारानं तोडगा काढण्याचे प्रयत्न...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन...मोदींनी बाप्पाची आरतीही केली... खासदार राऊतांची टीका
नागपूरमधील ऑडी अपघाताचं काँग्रेस कनेक्शन उघड, कार चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील जितेंद्र हावरे काँग्रेसचे पदाधिकारी, तर अपघातावेळी कारचा वेग ताशी ६० किमीच्या आसपास, आरटीओची एबीपी माझाला EXCLUSIVE बातमी
((नागपूर अपघाताचं काँग्रेस कनेक्शन))
गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातले पंचनामे तात्काळ करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश
((पंचनामे तात्काळ पूर्ण करा-फडणवीस))
७० वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट आयुष्मान भारत योजना लागू होणार, सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार
((७० वर्षांवरील सर्वांना 'आयुष्मान'चा लाभ))
डोळ्यांचा चष्मा उतरवण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉप्सवर भारत सरकारची बंदी. चुकीचा प्रचार केल्याचं कारण देत कारवाई