100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 सप्टेंबर 2024
मुंबईत राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन, पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांचा घोषणा.
राहुल गांधींविरोधात संभाजीनगरच्या क्रांती चौकात अतुल सावेंच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन, आरक्षण संपुष्टात आणण्यासंदर्भातील राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध.
नाशिकमध्ये भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन, भाजप आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुुरू, यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी.
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचं ज्ञानेश महारावांच्या विरोधात नागपूरमध्ये निषेध आंदोलन, शरद पवारांचाही नोंदवला निषेध.
अकोल्यात राहुल गांधींविरोधीत निषेध आंदोलन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलन,अमेरिकेत आरक्षणासंदर्भातील कथित वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक.
नागपुरात काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.