Latur Udgir : बुरखाधारी मुलीसोबत चित्रपट पाहणाऱ्या मुलांना मारहाण, प्रकरण काय?
Latur Udgir : बुरखाधारी मुलीसोबत चित्रपट पाहणाऱ्या मुलांना मारहाण, प्रकरण काय?
निमित्त ठरलंय बुरख्याचं आणि त्यावरून समाजात वाद निर्माण झालाय... ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील.
घडलं असं की, एक अल्पवयीन जोडपं बुरखा घालून काही मित्रांसोबत चित्रपट पाहायला गेले होतं. बुरखा घातलेल्या मुलीसोबत काही मुलं चित्रपट पाहात असल्याची माहिती काही तरुणांना कळली... त्यानंतर या तरुणांनी त्या मुलांना मारहाण केलीच, शिवाय रिक्षामधून अंड्याच्या दुकानात नेऊन पुन्हा मारलं. मारहाणीचे व्हिडीओदेखील काढले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी त्यांच्या पालकांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच चार आरोपींना अटक केली. दरम्यान, या प्रकरणी खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत दोन दिवसांपासून समाजातील काही लोक उदगीर शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आहेत.