एक्स्प्लोर

Samarjeet Ghatge Joins Sharad Pawar : समरजीत घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश, पाहा UNCUT VIDEO

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेते आणि माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी भाजपला अधिकृत रामराम केला आहे. त्यांनी आज (29 ऑगस्ट) सोशल मीडियातून अधिकृत घोषणा करताना शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. कागलमध्ये घेतलेल्या मेळाव्यात पुन्हा एकदा आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे. कागलच्या हितासाठी जो निर्णय घ्यायला लागेल तो निर्णय घेण्यासाठी तयार असल्याचं सांगत समरजित घाटगे यांनी आगामी विधानसभेला तुतारी फुंकण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. समरजित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्याचेही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे सांगितले होते. 

इथून पुढे तुम्हाला त्रास होणार, सरकारी ताकद लावली जाईल

दरम्यान, हा निर्णय घेत असताना माझ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो असल्याचेही समरजित घाटगे म्हणाले होते. नेत्यांना सांगून करण्यासाठी धमक लागते. प्रेम केलं तर तन-मन-धन करून करायचं. इथून पुढे तुम्हाला त्रास होणार, सरकारी ताकद लावली जाईल, पण हा समरजित तुमच्या पाठीशी असल्याचे ग्वाही कार्यकर्त्यांना दिली होती. सरकारी ताकद केवळ दोन महिने राहणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना इशारा दिला आहे. 

माझ्या आणि शरद पवार साहेबांच्या भेटी झाल्या

दरम्यान समरजित घाटगे पुढे म्हणाले की, 2019 मध्ये आपली तयारी नव्हती, पण आपण लढलो. आता विषय माझा नाहीतर कागलचा आहे. माझ्या आणि शरद पवार साहेबांच्या भेटी झाल्या. मला विचार करण्यास सांगितलं. मी कागलच्या जनतेला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही, असा निरोप त्यांना दिला होता. ते म्हणाले की आज जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागावं लागेल. लोकांना समजावून सांगा समरजितला मत का करायचं, असंही घाटगे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

कोल्हापूर व्हिडीओ

Kolhapur laser Light  Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजा
Kolhapur laser Light  Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 08 PM 16 September 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 08 PM : 16 September 2024: ABP MajhaNana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!ABP Majha Headlines : 08 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Embed widget