Kolhapur : Rahul Gadhi यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राहुल गांधीच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यानंतर ते कोल्हापूर येथील सयाजी हॉटेलमध्ये संविधान संमेलन घेणार आहेत.
या ठिकाणी ते बाराशे निमंत्रितांसोबत विचार मंथन करणार आहेत. राहुल गांधी संविधान संमेलनातून कोणती भूमिका घेत महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरे जाणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
राहुल गांधी शुक्रवारीच कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळा अनावरणासाठी येणार होते, परंतु यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कालचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला, त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले.
राहुल गांधी शुक्रवारीच कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळा अनावरणासाठी येणार होते, परंतु यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कालचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला,
“आज आपण मूर्तीचं अनावरण करत आहोत. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
हा केवळ एक पुतळा नाही. पुतळा जेव्हा बनवतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला, त्यांच्या कर्माला मनापासून समर्थन करतो.