Zero Hour : संघामध्ये सहभागी होऊ शकणार सरकारी कर्मचारी
Zero Hour : संघामध्ये सहभागी होऊ शकणार सरकारी कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्या टर्म सुरुवातीलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा करत होतो.. . तो म्हणजे सरकारी कर्मचारीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात, शाखेत उघडरीत्या सहभागी होऊ शकतील... त्यावर असलेली बंदी तबब्ल अठ्ठावण्ण (५८) वर्षांनंतर उठवण्यात आलीय.... त्यावरच आम्ही विचारलेल्या संघावरील प्रश्नावर महाराष्ट्राने दिलेला कौल पाहण्यासाठी जावूया आपल्या पोल सेंटरवर... संघ परिवारात ३६ संघटना आहेत.. ज्या समाजकारण, अर्थकारण, कृषी, आरोग्य, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे...नैसर्गिक आपत्तीच्या कामांमध्येही संघाचे स्वयंसेवक हिरीरीने काम करतात...पूर असो भूकंप असो रेल्वे किंवा विमानांची अपघात असो गणवेशातील संघ सेवक लगेच नजरेस पडतात...कोरोना काळात संघाच्या स्वयसेवकांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले...आदिवासी आणि वनवासी क्षेत्रामध्ये संघाचं सेवा कार्य सर्वश्रुत आहे... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक या देशाचा पंतप्रधान बनू शकतो, अगदी राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतो.. पण त्याच संघाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारी मात्र सहभागी होऊ शकत नव्हता.. याला मजेशीर विरोधाभासच म्हणायला हवा ..स्वयंसेवक संघ आपलं शतकं साजरा करणार आहे.. शताब्दी वर्षात संघ नेतृत्वाने स्वयंसेवकांसाठी जो संदेश दिला आहे, त्यात संघटनेला 100 वर्ष होत असताना जल्लोष करायचा नाही, मात्र संघटनेचा विस्तार नक्की करावा असा संदेश दिलाय... या विस्तारकार्यात बंदी आदेशाचा मोठा अडथळा मोदींनी दूर केला आहे... आता याचे प्रशासकीय, सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होतात हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईल.
झीरो अवरमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची... उद्या पुन्हा भेटूया ७ वाजून ५६ मिनिटांनी.. कुठेही जाऊ नका, पाहात राहा एबीपी माझा...