Trinamool Congress Lok sabha Election:तृणमूल काँग्रेसकडून 12महिलांना उमेदवारी, 4 अभिनेत्रींचा समावेश
Trinamool Congress Lok sabha Election:तृणमूल काँग्रेसकडून 12महिलांना उमेदवारी, 4 अभिनेत्रींचा समावेश
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व ४२ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. २०१९ प्रमाणे यंदाही ममता बॅनर्जी यांनी पक्षाकडून क्रिकेटपटूंपासून अभिनेता-अभिनेत्रींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तृणमूल काँग्रेसने १२ महिलांना उमेदवारी दिली आहे, ज्यात चार अभिनेत्री आहेत. तर माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद आणि युसूफ पठाण यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारी यादीमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मिमि चक्रवर्ती आणि नुसरत जहां या दोघींचं तिकीट कापण्यात आलंय. मिमी चक्रवर्ती जाधवपूर तर नुसरत जहां बशीरहाट मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. बशीरहाट लोकसभा मतदारसंघातच संदेशखाली परिसर येतो. तर संसदेतून निष्काषित करण्यात आलेल्या महुआ मोईत्रा यांना पुन्हा कृष्णानगरमधूनच उमेदवारी देण्यात आली आहे.