Supreme Court Hearings : सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या सुनावण्या ABP Majha
सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या सुनावण्या आहेत. टाटा ग्रुप आणि सायरस मिस्त्री प्रकरणात मिस्त्री यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मिस्त्री यांना चेअरमनपदावरून हटवण्याच्या टाटा सन्सच्या निर्णयाला न्यायालयानं वैध ठरवलं होतं. त्यावर मिस्त्री यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलीय. दुसऱ्या एका सुनावणीत राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी पेरारीवलनची तुरुंगातून सुटका करण्याबाबतचे आदेश न्यायालय आज देऊ शकतं. पेरारीवलन याला जामिनावर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मार्च महिन्यात दिले होते. पण याबाबतच्या फाईलवर निर्णय न घेता ती तामिळनाडूच्या राज्यपालांनी राष्ट्पतींकडे पाठवली होती. त्यामुळे न्यायालय आता त्याच्या मुक्ततेचे आदेश देऊ शकतं. याशिवाय शिना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जीच्या जामीन अर्जावरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.