Share Market Sensex : जून 2022 नंतरची शेअर बाजारातली सर्वात मोठी घसरण
Share Market Sensex : जून 2022 नंतरची शेअर बाजारातली सर्वात मोठी घसरण शेअर बाजारात आज ब्लडबाथ पाहायला मिळाला. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जून २०२२ नंतरची सर्वात मोठी घसरण आज पाहायला मिळाली. निफ्टी दिवसभरात २१ हजार ५५०.४५ च्या निचांकी पातळीला स्पर्शून आला. निफ्टी ४६० अंकांनी कोसळला. दिवसअखेर निफ्टी २१ हजार ५७१ अंशांवर बंद झाला. तर सेन्सेक्स तब्बल १६२८ पॉईंट्नी कोसळत ७१ हजार ५००.७६ वर बंद झाला. एचडीएफसी बँकेने तिमाही निकाल जाहीर केल्यावर शेअरमध्ये कमालीची घसरण झाली. तब्बल ८ टक्क्यांनी एचडीएफसीचे शेअर्स कोसळले. एचडीएफसीच्या घसरणीमुळे मार्केटमध्ये शॉकवेव्हज सुरू झाल्या. त्याचा मोठा धक्का इतर बँकांच्या शेअर्सनाही सहन करावा लागला. निफ्टी बँकमध्ये ४ टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी बँकमधील सर्वच शेअर्स निगेटिव्ह होते.























