एक्स्प्लोर
Omicron : ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार भारतातही झालेला असू शकतो : डॉ. पांडा ABP Majha
ओमायक्रॉन व्हेरियंटचा शोध लागण्याआधीच त्याचा भारतात प्रसार झाला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशात तो आढळला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं आयसीएमआरच्या डॉक्टर समीरण पांडा यांनी म्हटलंय. आफ्रिकन देशांत ओमायक्रॉनचं अस्तित्व पहिल्यांदा ९ नोव्हेंबरला आढळलं. दक्षिण आफ्रिका आणि अन्य देशांतून काही महिन्यांत अनेक प्रवासी जगभरात गेले आहेत. त्यांच्यापैकी काही जणांना बाधा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातही हा विषाणू आढळून येऊ शकतो, असं डॉक्टर पांडा यांनी म्हटलंय.
आणखी पाहा























