एक्स्प्लोर
Coronavirus India Update | भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 10 लाखांच्या पार!
जगभरातील कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे एक कोटी 39 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. जगभरात मागील 24 तासात 2.47 लाख नवीन कोरोना केस समोर आल्या आहेत, तर 5,714 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील कोरोनाचा कहर वाढला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासात 32 हजारांहून अधिक रुग्ण भारतात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 39 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाख 92 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 82 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
आणखी पाहा























