एक्स्प्लोर

Manu Bhaker Exclusive : ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक! मनू भाकर 'एबीपी माझा'वर ABP Majha

Manu Bhaker Exclusive : ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक!  मनू भाकर 'एबीपी माझा'वर ABP Majha  पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे.   फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4 दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9 उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3  पॅरिस ऑलिम्पिकमधली कांस्यपदक विजेती नेमबाज मनू भाकरची प्रतिक्रिया- -ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न मी नेहमीच पाहात होते. ते मिळेल की नाही, याची खात्री नव्हती. पण अखेर ते स्वप्न आज साकार झालं.  -याक्षणी माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. कारण मी देशासाठी, आपल्या साऱ्यांसाठी आज पदक जिंकू शकले.  -मी सध्या गीतापठण खूप करते. कर्म पे ध्यान दो, फल की चिंता मत करो, ही गीतेतून मिळणारी सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. काल संध्याकाळी फायनलमधलं स्थान पक्कं झाल्यापासून आज अखेरचा लक्ष्यवेध करेपर्यंत माझ्या डोक्यात तोच विचार होता की, कर्म पे ध्यान दो, फल की चिंता मत करो...  -कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं...  -माझ्या कामगिरीत प्रशिक्षक जसपाल राणांचा मोलाचा वाटा. त्यांनीही माझ्याइतकाच घाम गाळला आणि रक्त आटवलं. मी त्यांच्यासाठी कृतज्ञ आहे.  -जसपाल राणा यांची सरावादरम्यान मला एक लक्ष्य देण्याची पद्धत आहे. त्यांनी दिलेल्या लक्ष्याइतका माझा स्कोर झाला नाही, की ते मला ज्या देशात असू, तिथल्या चलनात दंड करायचे. मग तेवढ्या रकमेच्या दंडातून मला सामाजिक कार्य करणं भाग असायचं. ती रक्कम कधी ४० युरो, तर कधी ४०० युरो असायची.  -टोकियोत माझ्या पिस्टलमधल्या तांत्रिक दोषानं मला खूप मोठा धडा शिकवला. कदाचित तो माझा बेजबाबदारपणा असावा. आयुष्यात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिंकता येत नसतं.   -कधी कधी तुम्ही अनुभवातून शिकतही असता आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या धड्यातून मी खूप काही शिकले.  -काल रात्री शांत झोप लागली. कारण पदक मिळेल की नाही, याचा मी विचार करत नव्हते. आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. हिंमत सोडायची नाही, एवढाच मी मनाशी निश्चय केला होता.  -टोकियो ऑलिम्पिकनंतर मी खूप धार्मिक झाली आहे. पण अजिबात कट्टर नाही. मी देवाला मानते. आपल्यासभोवती असलेली उर्जा आपल्याला मार्ग दाखवत असते. देवानं ही सृष्टी घडवली. तुम्हा आम्हाला घडवलं. त्याच्यावर आपल्याला विश्वास असायला हवा.

भारत व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
Embed widget