(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Independence Day 2021 : स्वातंत्र्य दिन चिरायू होवो; लाल किल्ल्यावर PM Modi यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रत्येक देशाच्या विकासाची एक वेळ असते, भारत नव्या संकल्पातून पुढे जात असताना आता विकासाची आता वेळ आली असून ती संधी आपल्याला साधायला हवी. त्यासाठी भारतीय सामर्थ्याचा पूर्ण वापर करणे ही काळाची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या सोहळ्यानिमित्त ते लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करत होते.
देश नव्या संकल्पातून पुढे जात असून नवीन संकल्पांना आधार बनवून विकास साध्ये करायला हवा. आज भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून येत्या 25 वर्षात भारतीय स्वातंत्र्य 100 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. या अमृतकाळाच्या सोहळ्यावेळी आपण आज केलेल्या संकल्पांची सिध्दी करणं आवश्यक आहे. ती आपल्यासाठी गौरवपूर्ण गोष्ट असेल.
स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवाच्या वेळी भारतातील सुविधांचा आणि विकासाचा स्तर हा गाव आणि शहरात भेदभाव करणारा नसेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. नागरिकांच्या जीवनात सरकार विनाकारण दखल नाही आणि देश अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी समृद्ध असेल. त्यासाठी आपण आपल्या संकल्पनेला परिश्रमाची आणि पराकाष्टाची जोड देणं आवश्यक आहे.