![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Disney Hotstar : रिलायन्स डिस्ने कंपनी विकत घेण्याच्या तयारीत,स्टार चॅनलही रिलायन्सकडे जाणार
Disney Hotstar : रिलायन्स डिस्ने कंपनी विकत घेण्याच्या तयारीत,स्टार चॅनलही रिलायन्सकडे जाणार
मनोरंजन क्षेत्रातून मोठी बातमी आहे. डिस्ने कंपनीच्या भारतातील व्यवसायात रिलायन्स इंडस्ट्रीज मोठा वाटा विकत घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. कराराचा नेमका आकडा समजू शकला नसला तरी रिलायन्स इंडस्ट्रीज ७ ते ८ अब्ज डॉलर्स अर्थात ५६ ते ६४ हजार कोटी रुपये मोजण्याची शक्यता आहे. डिस्ने मात्र आपल्या कंपनीचं मूल्यांकन १० अब्ज डॉलर्स अर्थात ८० हजार कोटी इतकं करतंय, असंही समजतंय. पुढील महिन्यात या कराराची औपचारिक घोषणा करण्यात येईल, असंही ब्लूमबर्गनं आपल्या वृत्तात म्हटलंय. डिस्ने कंपनी घेण्यासाठी अदानी समूह देखील इच्छुुक होता, एवढंत नाही तर हा समूह शर्यतीत पुढे देखील होता. मात्र अखेर डिस्नेनं आपला वाटा अंबानींच्या रिलायन्सला विकण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. स्टार नेटवर्कचे सर्व चॅनल आणि डिस्ने हॉटस्टार हा ओटीटी प्लॅटफॉर्म हे डिस्ने इंडियाचे मुख्य व्यवसाय आहेत. मात्र गेल्या वर्षी जिओनं आयपीएलचे हक्क विकत घेतल्यानं डिस्नेला असणारी स्पर्धा वाढली. सस्क्राईबर संख्याही घटली. तेव्हापासून डिस्नेच्या अमेरिकेतील मुख्यालयातून भारतातील व्यवसाय विकण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
![Ram Mandir Threat : राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची धमकी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/e013676aa4eff4e2c843380cd551eb311718374506054977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![NEET Exam : नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/08e0591ad38ef6ceabaf37e51120dbf5171826394838090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut Full PC : केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मे - संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/a00a5df199758ec447b8eb945ce0a4971718086157404719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mohan Bhagwat Full Speech : निवडणुकीच्या प्रचारात तेढ निर्माण केली, संघाला त्यात नाहक ओढण्यात आलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/96deee3854e876becc957d0010c628f51718067483538719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर, गडकरी ते मोहोळ, कुणाला कुठलं खातं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/8c14d4bda1342f9612aaa7655e85ccfa171803348098890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)