Corona New Variant : केरळमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट
Corona New Variant : केरळमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट देशात आता कुठे कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं दिसंत होतं. मात्र आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोके दुखी वाढवलीय.. केरळमध्ये हा सबव्हेरियंट आढळून आलाय. BA.2.86 च्या जातीतील JN.1 हा विषाणू आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाची चिंता निर्माण झाली आहे. तसंच लसीकरण घेतलेल्यांनाही या व्हेरियंटचा धोका उद्भवू शकतो. हा विषाणू वेगाने पसरणारा असल्याचीही माहिती समोर आली आहे. JN.1 हा विषाणू अमेरिकेत सप्टेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा आढळला होता.नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात महिन्यांच्या अंतरानंतर भारतात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र यामध्ये पूर्वीसारखी तीव्रता दिसून येत नसल्याचंही सांगण्यात येतंय. . तसंच पूर्वीच्या प्रकारांपेक्षा हा विषाणू वेगळा असल्याचीही माहिती आहे.