Babri Masjid demolition case | बाबरी विध्वंस प्रकरणी आज अंतिम फैसला; CBIचं विशेष न्यायालय निकाल सुनावणार
अयोध्येतला राम जन्मभूमीचा खटला निकाली निघाला आहे. तिथे भूमिपूजन पण झाले. आता 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज येणे अपेक्षित आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटला लखनौच्या विशेष न्यायालयात खटल्याच्या अंतिम टप्प्यात आहे. ह्या 28 वर्षात काय काय घडले याचा हा लेखाजोखा आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारच्या पहिला शिलान्यास सोहळा ते 6 डिसेंबर 1992 ला बाबरी पाडली गेली या दरम्यान सुरुवातीच्या जिल्हा न्यायालय नंतर अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण विविध टप्प्यावर सुनावणीला आले आहे. ह्या दरम्यान अनेक रंजक घडामोडी घडल्या. देशातला एका मोठा समुदायास या निकालाची प्रतिक्षा आहे. राम मंदिरासंदर्भात निकाल देताना मशिद बेकायदेशीरपणे तोडली गेली असा उल्लेख आहे. आज मशिद कुणी पाडली? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
उत्तर प्रदेशच्या अयोध्या मधील बाबरी मशिदीची निर्मिती मोगल बादशहा बाबरचा जनरल मीर बाकी यांनी केली होती, अनेक ऐतिहासिक दस्तांवेजांनुसार ही मशिद रामाचे जन्म स्थळ असलेल्या मंदिरा वरच बांधली गेली होती. ज्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाने यावर्षीच निवाडा दिला आहे.