Ahmedabad plane crash : भारतातली सर्वात मोठी विमान दुर्घटना, कसा घडला अपघात? 242 प्रवाश्यांचा मृत्यू
लंडनला जाण्यासाठी अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानानं उड्डाण घेतलं... विमानानं उड्डाण घेतल्यानंतर प्रवाशांनी मोकळा श्वासही घेतला नव्हता तोच विमान कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं..आजवरची भारतातली ही सर्वात मोठी विमान दुर्घटना मानली जातेय.. कसा घडला हा अपघात.. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट
तारीख १२ जून अहमदाबादवरुन लंडनला जाण्यासाठी २३० प्रवासी निघाले कुणी आपल्या कुटुंबासोबत कुणी कुटुंबाचा निरोप घेऊन तर कुणी आपल्या मायदेशी जाण्यासाठी निघालं यासगळ्या मंडळींमध्ये एक व्हीआयपी प्रवासी होते ते म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी विमानाकडे जाण्यापूर्वी या सर्व प्रवाशांनी एकदा मागे फिरुन आपल्या माणसांना हात करुन निरोप दिला. आणि निघाले लंडनवारीला यातल्या एकालाही वाटलं नसेल हा त्यांचा शेवटचा प्रवास असेल वेळ होती दुपारी दीड वाजताची लंडनकडे निघालेले प्रवासी विमानात बसले
बरोबर १.३१ मिनिटांनी अहमदाबादवरुन लंडनकडे विमानाने उड्डाण केलं
६२५ फुटांच्या उंचीवर हे विमान पोहोचलं
आणि क्षणात आकाशाकडे झेपावलेलं विमान धाडकन जमिनीवर कोसळलं
विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या आठ मिनिटांत विमान कोसळलं
काही कळण्याच्या आत विमानाच्या चिंधड्या झाल्या होत्या..
विमान क्रॅश होण्याच्या आधी पायलटनं आपत्कालीन संदेश पाठवला होता. पायलट सभरवाल यांनी 'मे-डे कॉल' करत विमानात बिघाड झाल्याचं कळवलं होतं पण समोरुन काही संदेश येण्याच्या आत विमान कोसळलं लंडनला निघालेल्या या विमानाची इंधन टाकी पूर्णपणे भरलेली होती त्यामुळे विमान कोसळताच मोठा स्फोट झाला























