डॉक्टर आणि पोलिसांच्या वेशातील बाप्पाची सुंदर मूर्ती, मूर्तीकार योगेश टिळे यांचा योद्ध्यांना सलाम!
कोरोना नावाच्या महासंकटाला भारतातून पळवून लावण्यासाठी डॉक्टर्स आणि पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. कोरोना बाधितांसाठी सध्या हेच देवरूपी धावून येत असून खऱ्या अर्थाने ते देशसेवा करत आहेत आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न नाशिकमधील योगेश टिळे या मूर्तीकाराने केला असून डॉक्टर आणि पोलिसांच्या वेशातील सुंदर गणपती मूर्ती त्याने घडवल्या आहेत. या मूर्तीच्या उजव्या बाजूला आपल्याला पोलीस तर डाव्या बाजूला डॉक्टर बघायला मिळत असून तिरंगा, इंजेक्शन, पोलीस काठी, पोलीस टोपी अशा सर्व छोट्या मोठ्या गोष्टी त्याने साकारल्या आहेत यासोबतच मूर्तीच्या तळाशी डॉक्टर आणि पोलिसांचे ब्रिदवाक्यही लिहिण्यात आले असून एक पृथ्वीचे कवच तयार करत कोरोना विषाणूने अख्ख जग व्यापलय हे ही दाखवण्याचा प्रयत्न त्याने केलाय.




















