Dhule मध्ये गावात बैलांची मिरवणूक काढल्याने मागासवर्गीयांवर बहिष्कार टाकण्यात आल्याचा प्रकार समोर
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसरीकडे मात्र मागासवर्गीयांवर बहिष्कार टाकण्यासारख्या घटना घडतायत... पोळ्यानिमित्त गावात बैलांची मिरवणूक काढल्याने मागासवर्गीयांवर बहिष्कार टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय., धुळे जिल्ह्यातील मेहेरगाव इथं ही संतापजनक घटना घडलीय... पोळा सण साजरा करताना गावातील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित ग्रामस्थांनी केलाय... पोलिसांनीही मागासवर्गीय तरुणांवर नाहक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही करण्यात आलाय.. ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय असून याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी यामागणीसाठी मेहेरगावमध्ये निदर्शनं करण्यात आली....
महत्त्वाच्या बातम्या














