Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली'
याच मैदानावर शिवसेनाप्रमुखांना मी जवळून पाहिले होतं.कारण त्यावेळी सूत्रसंचालन मी स्वतः केले होते. कुठेही जाहिरात, बॅनर नसताना लाखोंचा जनसमुदाय मैदानावर एकत्र आला होता.आता त्याच ठिकाणावर महाविकास आघाडीची सभा होत आहे. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा यज्ञकुंड जिथे पेटवला, जेथून विचार दिले त्या विचाराला गद्दारी करण्याचं काम त्या स्टेजवर होणार आहे. शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे काँग्रेसला गाडले पाहिजे, समाजामध्ये काँग्रेस दूरी माजवतं आहे. पण आता एकीकडून काँग्रेस बसलाय आणि एकीकडून राष्ट्रवादी बसणार आहे.तर मध्ये उद्धव ठाकरे बसणार असल्याचे चित्र म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी आहे**याच्या यातना आम्हाला होतात. बाळासाहेबांनी जे चित्र पाहिले त्याच्या विरोधात उद्या चित्र दिसेल आणि हा अवमान नाही तर त्यांच्या विचाराला श्रद्धांजली आहे.























