Sambhajinagar Uniform Sting Operation : गणवेश विकत घेण्यापुर्वी पालकांनी हे स्टिंग ऑपरेशन बघाच
Sambhajinagar Uniform Sting Operation : गणवेश विकत घेण्यापुर्वी पालकांनी हे स्टिंग ऑपरेशन बघाच
छत्रपती संभाजीनगरमधल्या काही गणेवश विक्रेत्या दुकानदारांचं एबीपी माझानं स्टिंग ऑपरेशन केलं. त्यात काही दुकानांमध्ये आपल्या मुलांच्या शाळेचे गणवेश खरेदी करण्यासाठी सध्या पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. या गर्दीचं कारण आहे संस्थाचालकांकडून होणारी सक्ती. बहुतेक शाळांकडून पालकांना विशिष्ट दुकानामधूनच गणवेश खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. आणि त्यामागे संस्थाचालक आणि दुकानदारांच्या टक्केवारीचा खेळ असतो. गणवेश विक्रेते हे शाळाचालकांना १० टक्के कमिशन देतात, अशी माहिती आहे. वर्षाला हजारो गणवेशांचा खप होतो. त्यामुळं कमिशनचा खेळ कोट्यवधींमध्ये जात असल्याचा अंदाज आहे.























