(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhajinagar : शहरात नाही राम, नेते मात्र यात्रा आणि सभांवर ठाम ABP Majha
Sambhajinagar : शहरात नाही राम, नेते मात्र यात्रा आणि सभांवर ठाम ABP Majha
उद्यापासून महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेना यांच्यातील खऱ्या सामन्याला सुरुवात होतेय... उद्या पहिल्यांदा महाविकास आघाडीची एकत्र जाहीर सभा होतेय आणि तिही छत्रपती संभाजीनगरमध्ये. या सभेला वज्रमूठ असं नाव देण्यात आलंय. या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. तर उद्याच संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरात दंगल उसळली होती. त्यामुळे किराडपुरा भागात आजही पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. हे कमी म्हणून की काय संभाजीनगर जवळील ओहर गावातही दगडफेक झाली होती. अशा परिस्थितीतही महाविकास आघाडीचे नेत सभेवर आणि भाजप-शिवसेना गौरव यात्रेवर ठाम आहेत. त्यामुळे उद्या संभाजीनगरचं वातावरण बिघडलं तर जबाबदार कोण?, शहराच्या शांततेपेक्षा नेत्यांना सभा आणि यात्रा महत्त्वाची आहे का? सभा, यात्रा पुढे ढकलली असती तर काय बिघडलं असतं? असे प्रश्न विचारले जातायत.