Chhatrapati Sambhaji Nagar:सिद्धार्थ उद्यानातील पांढऱ्या अर्पिता वाघिणीनं दिला तीन बछड्यांना जन्म
Chhatrapati Sambhaji Nagar : सिद्धार्थ उद्यानात 3 पांढऱ्या वाघांचे आगमन , अर्पिता वाघिणीनं दिला तीन बछड्यांना जन्म
एक आनंदाची बातमी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानात असलेल्या पाणी प्राणिसंग्रहालयात आणखी 03 पांढऱ्या वाघांचे आगमन झालं आहे . प्राणीसंग्रहालयातील पांढरे वाघीन अर्पीता हिने तीन पांढरे बछड्यास जन्म दिलेला आहे.
अर्पीता वाघीण आणि बछड्याची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांचे मार्फत करण्यात आलेली आहे. दोघांची तब्येत सुदृढ आहे. बछडे आईचे दुध पितांना दिसुन आलेले आहेत. वाघीण स्वतः बछड्याची निगा आणि काळजी घेत आहे. वीर आणि अर्पीता या वाघाच्या जोडीमुळे बछड्याचा जन्म झालेला आहे.आज जन्मलेल्या 03 बछड्या मुळे आता एकूण 06 पांढरे वाघ झाले आहेत.























