एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावर 69 हजार जणांचा आक्षेप
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयावर 27 मार्चपर्यंत आक्षेप आणि हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते, यासाठी अजुनही शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना नामांतराविरोधात आतापर्यंत ६९ हजार आक्षेप दाखल झाले आहेत. तर समर्थनार्थ केवळ ४५० अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवसात २४ हजार आक्षेपाचे अर्ज विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झालेत... केवळ संभाजीनगरच नाही तर राज्यभरातून आक्षेप अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर नामकरणाच्या समर्थनार्थही आज उद्या मोठ्या प्रमाणावरती अर्ज दाखल होणार असल्याची माहिती आहे..
आणखी पाहा























