Buldhana : बुलढाण्यात धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ, राज्यपाल आणि शिंदे गट निशाण्यावर
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समर्थक आमदार-खासदारांसह कामाख्याच्या दर्शनासाठी गुवाहाटी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आज बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांची संध्याकाळी सभा होणार आहे. विशेष म्हणजे बुलढाण्यातले दोन आमदार आणि एका खासदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.. त्यामुळे विदर्भात आपला झेंडा कायम राखण्यासाठी ठाकरेंच्या याच दौऱ्याला विशेष महत्वं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विदर्भ दौऱ्यावर आहेत. खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंनाच आव्हान दिलंय.. त्यामुळे यांच्याविरोधात आणि राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात उद्धव ठाकरे काय बोलणापर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय..






















