Buldana मध्ये खामगावमधील शासकीय विश्रामगृह दारुड्यांचा अड्डा बनलाय का? : ABP Majha
बुलढाण्याच्या खामगावमधील शासकीय विश्रामगृह दारुड्यांचा अड्डा बनलाय का? असा सवाल उपस्थित झालाय... सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या शासकीय विश्रामगृहाबाहेर दारुच्या बाटल्यांचा खच पडल्याचं दिसून आलंय... विश्रामगृहात येणारे शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्तेचं मद्य पार्टी करत असल्याचं बोललं जातंय... याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी यावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला... इंग्रजांच्या काळापासून ही विश्रामगृह आहेत... मात्र आता ही विश्रामगृह शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी मदिरालये बनत चालली आहेत का..? असा सवाल उपस्थित होत आहे...






















