एक्स्प्लोर
Buldhana Onion Loss : हजारो शेतकऱ्यांचा कांदा काढण्याआधीच सडल्याने बुलढाण्यात मोठे नुकसान
एकट्या बुलढाणा जिल्ह्यात यंदा ४ हजार हेक्टरहून अधिक कांद्याची लागवड करण्यात आली होती, एप्रिल महिन्यात जवळपास २ हजार ६०० हेक्टरवरील कांदा शेतकऱ्यांनी साठवून ठेवला, भविष्यात कांद्याला भाव मिळेल अशी आशा या शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसतोय, त्यमुळे अनेक शेतकऱ्यांचा काढणीला आलेला १ हजार ४०० हेक्टरवरील कांदा जमिनीतच सडतोय, यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अवकाळीमुळे झालेल्या नुकसाचे पंचनामे करत सरकारनं लवकरात लवकर मदत करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केलीय.
आणखी पाहा























