Tumsar Bhandara : धान खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांची लूट, 1600 रुपयांना धान खरेदी
Tumsar Bhandara : धान खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांची लूट, 1600 रुपयांना धान खरेदी
जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचा योग्य सन्मान व्हावा, त्यांच्या शेती उपज मालाला योग्य दर मिळावा, यासाठी राज्य सरकारनं जिल्ह्यात 242 धान खरेदी केंद्र मंजूर केलेत. मात्र, त्यातील बहुतांश: केंद्र सुरू झालेली नाहीत किंबहुना अनेक केंद्र हे केवळ कागदोपत्री सुरू दाखविण्यात आल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे धान नाईलाजाने व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. शासनाकडून प्रति क्विंटल 2040 रुपये दर दिल्या जातो. मात्र, येथील व्यापारी शेतकऱ्यांचे धान विकत घेताना केवळ 1600 ते 1700 रुपये देवून बळीराजाची एक प्रकारे थट्टा करून त्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे धक्कादायक चित्र सध्या भंडाऱ्यातील तुमसर बाजार समितीत बघायला मिळत आहे.



















