एक्स्प्लोर
Bhandara Heavy Rain :पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस,गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. पूर्व विदर्भात मागील दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. परिणामी, वैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गोसीखुर्द धरणाच्या ३३ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















